top of page

आशा भोसलेंनी शेअर केला लतादीदींसोबत बालपणीचा फोटो आणि म्हणाल्या…

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं काल (रविवार ६ फेब्रुवारी) निधन झालं. .त्यांच्या निधनामुळे फक्त भारतात नव्हे जगभरातून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. नुकतंच लता मंगेशकर यांची बहीण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी इन्स्टाग्रामवर लता मंगेशकर यांच्या आठवणीत एक फोटो शेअर केला आहे.

आशा भोसले यांनी बालपणीचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी त्याला भावनिक कॅप्शनही दिले आहे. ‘बालपणीचे दिवस काय होते बहिण आणि मी’, असे कॅप्शन देत त्यांनी हार्ट इमोजी शेअर केला आहे. दरम्यान आशा भोसले यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.



 
 
 

Comments


bottom of page