top of page

आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासंबंधीच्या केलेल्या वक्तव्यप्रकरणी भाजपा नेते आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वरळीतल्या सिलिंडर स्फोट प्रकरणी टीका करताना शेलार यांनी पेडणेकर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर नरिमन पॉईंट पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ree

गेल्या आठवड्यात वरळीला एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता, त्यानंतर जवळपास तीन दिवसांनी महापौर रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावरुन आशिष शेलार यांनी महापौरांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरला होता.


 
 
 

Comments


bottom of page