top of page

दुखापतीमुळे अजिंक्य रहाणेसह ३ खेळाडू दुसऱ्या कसोटीतून बाहेर!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात विराट कोहलीचे पुनरागमन होणार असलं तरी सामना सुरु होण्याआधीच भारताला धक्का बसला आहे. दुखापतीमुळे उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह इशांत शर्मा, रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. बीसीसीआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

इशांत शर्माच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. पहिल्या कसोटीत जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती आणि स्कॅनमध्ये सूज असल्याचे दिसून आले. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. कानपूरमध्ये शेवटच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना रहाणेला हाताला किरकोळ दुखापत झाली. तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही.



दरम्यान,अजिंक्य रहाणेला खराब फॉर्म मुळे वगळल्याची चर्चा होताना दिसत आहे.

 
 
 

Comments


bottom of page