top of page

अ‍ॅपल (Apple) चे सीईओ कुक यांनी घेतला वडापावचा आस्वाद

अ‍ॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक हे भारतातील पहिल्या अ‍ॅपल स्टोअरच्या उद्घाटनासाठी भारत दौऱ्यावर आले आहेत.

ree

मुंबईत आल्यानंतर त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत मुंबईच्या प्रसिद्ध वडापावचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे माधुरी दीक्षित आणि टिम कुक दोघांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एकत्र वडापाव खातानाचे फोटो ट्विट केले आहेत.


माधुरी दीक्षितने “मुंबईत स्वागत करण्यासाठी वडा पाव खाऊ घालण्यासारखा उत्तम पर्याय नाही!” असं म्हणत हा फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. टीम कुक यांनी हा फोटो शेअर करत ट्विटरवरुन माधुरीचे आभार मानले आहेत. “मला माझा पहिल्या वाडापावची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. वडापाव खरंच खूप चविष्ट होता”, असं कुक आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.


 
 
 

Comments


bottom of page