top of page

अजित पवारांनी भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवला

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप

ree

हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीला पुण्यातील मांजरी खुर्द येथील २८ एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. त्याचबरोबर आवश्यक यंत्रसामग्रीसह इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. दरम्यान, भारत बायोटेकच्या पुण्यातील प्रकल्पावरून भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. भारत बायोटेक कंपनी कोव्हॅक्सिन लसीच्या निर्मितीसाठी नागपूरच्या मिहानमध्ये प्रकल्प सुरु करणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले राजकीय वजन वापरून हा प्रकल्प पुण्याला पळवला असल्याचा आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केला आहे.


सिरम आणि भारत बायोटेकला मिहानमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांनी ऐनवेळी राजकीय वजन वापरुन भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्यात नेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मिहान प्रोजेक्टबद्दल माहिती होती. असं असतानाही विदर्भावर अन्याय करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबाबत त्यांनी शब्दही काढला नाही, हा विदर्भावर अन्याय आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह इतर काँग्रेस नेते गप्प का बसून आहेत, असा सवाल कृष्णा खोपडे यांनी विचारला.


 
 
 

Comments


bottom of page