top of page

Video पहा : ‘आज हमारे दिल में’ या गाण्याचं ‘ऊ अंतावा’ व्हर्जन

सध्या देशभरात "पुष्पा" चित्रपटाने सगळ्यांना वेड लावले आहे. चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनचे डायलॉग्स आणि गाणी प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ‘सामी सामी’ आणि ‘ऊ अंतावा’ या गाण्यावरील व्हिडीओ रील्स तर आपण सगळ्यांनी पाहिले. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी मी ही ट्रेंडसोबत आहे असं म्हणत शुक्रवारी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ही काही वेळातच व्हायरल झाल्याचे दिसते आहे.

अनुपम खैर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील ‘आज हमारे दिल में’ या गाण्याचा व्हिडीओ तर व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘ऊ अंतावा’ हे गाण्याचा ऑडिओ प्ले होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत “ट्रेंडसोबत मी पण आहे. ‘हम आपके है कोण’ या चित्रपटातलं एक आयकॉनिक गाणं आणि ‘पुष्पा’ या चित्रपटातील लोकप्रिय ठरलेलं गाणं,” अशा आशयाचे कॅप्शन देत अनुपम यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.


Comments


bottom of page