top of page

Video : ऑर्डर कसली मागतायेत ते?....पोलीस फोर्स वापरुन करा… अनिल परब यांचा व्हिडीओ व्हायरल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून मंगळवारी अटक करण्यात आली. मात्र, राणे यांना अटक करण्याचा आदेश दिला कुणी? याबाबत चर्चा सुरु असतानाच प्रसारमाध्यमांमध्ये अनिल परब यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते पोलिसांना राणे यांना अटक करण्याचा आदेश देत असल्याचं दिसते.

ree

रत्नागिरीचे पालकमंत्री असणारे अनिल परब मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांना फोन आल्याने पत्रकार परिषद थांबवली होती. अनिल परब यांचं फोनवरील संभाषण यावेळी तेथील माईकमुळे ऐकू येत होतं. त्यानंतर अनिल परब यांनी पोलीस अधिकाऱ्याला दुसरा फोन लावला. यावेळी त्यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याचे यामध्ये दिसतेय. मात्र, समोर कोण बोलत होतं? हे अस्पष्ट आहे.

काय आहे व्हिडिओत?

हॅलो, काय करताय तुम्ही लोकं??

नाय पण ते करावं लागेल तुम्हाला.. तुम्ही.. घेताय की नाही ताब्यामध्ये?

ऑर्डर कसली मागतायेत ते?

अहो कोर्टाने जे काय आहे ते....

हायकोर्ट आणि सेशन कोर्ट दोघांनीही नाकारला आहे.त्यांचा जामीन

पण मग घ्या ना.... पोलीस फोर्स वापरुन करा… अहो वेळ लागणार मग कोर्टबाजी चालूच आहे ना त्याची

ठिकाय.. ओके

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यावेळी अनिल परब यांच्या शेजारीच बसले होते. यावेळी ते राणेंना अद्याप ताब्यात घेतलं नसल्याचं भास्कर जाधवांना सांगत असल्याचं ऐकू येत आहे.

हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.


 
 
 

Comments


bottom of page