top of page

ईडीची मोठी कारवाई; अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपये किंमतीची संपत्ती जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती ईडीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे.

ree

दिवसेंदिवस अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढच होताना दिसून येत आहे. अनिल देशमुख यांना आत्तापर्यंत तीन वेळा ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. ईडीनं याआधीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावले असताना आता त्यांच्यावर ईडीनं मोठी कारवाई केली आहे. ईडीनं आज जप्त केलेल्या आलेल्या ४ कोटी २० लाखांच्या मालमत्तेमध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी आरती देशमुख आणि प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपत्तीचा समावेश आहे. यामध्ये वरळीतील १ कोटी ५४ लाख रुपयांचा फ्लॅट आणि २ कोटी ६७ लाख रुपये किंमतीची रायगडच्या उरणमधील जमीन यांचा समावेश आहे.


 
 
 

Comments


bottom of page