top of page

स्मार्टफोन वापरता ? 11 मेपासून 'हे' फिचर वापरता येणार नाही; Google चा मोठा निर्णय

Android स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गुगलने आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला असून गुगलची नवी पॉलिसी 11 मेपासून लागू होणार आहे. नव्या पॉलिसीनुसार, प्ले स्टोअरवर असलेले कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप निष्क्रिय होतील. अँड्रॉइड फोनवर तुम्ही कॉल रेकॉर्डिंगसाठी या अ‍ॅपचा वापर करू शकणार नाही.

ree

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या पॉलिसीनुसार, अ‍ॅप डेव्हलपर्सला कॉल रेकॉर्डिंगसाठी एक्सेसिबिलिटी एपीआयची सुविधा मिळणार नाही आणि ही सुविधा बंद झाल्यास अँप रेकॉर्डिंगचं काम करू शकणार नाही. ही सुविधा बंद झाल्यास ट्रूकॉलर, ऑटोमेटिक कॉल रेकॉर्डरसह अनेक रेकॉर्डिंग अ‍ॅप काम करणार नाहीत.

तुमच्या अँड्रॉइड फोनच्या डायलरमध्ये डिफॉल्ट रुपात कॉल रेकॉर्डिंग सुविधा असल्यास रेकॉर्डिंग करता येईल. प्री-लोडेड अ‍ॅप किंवा फीचरसाठी एक्सेसिबिलिटी एपीआय परमिशनची गरज नाही. Google Pixel आणि शाओमी (Xiaomi) स्मार्टफोनमध्ये ही सुविधा डिफॉल्ट रुपात आहे. त्यामुळे या युजर्सला कॉल रेकॉर्डिंगची सुविधा मिळेल.


 
 
 

Comments


bottom of page