top of page

अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा ऑस्ट्रेलियामध्ये एका कार अपघातात मृत्यू झाला. क्विन्सलॅण्डमधील अ‍ॅलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सायमंडची गाडी रस्ता सोडून बाजूला जाऊन उलटली. शनिवारी रात्री १०.३० वाजता हा अपघात झाला. त्यामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. सायमंड्सच्या मृत्यूनंतर अनेक दिग्गजांनी ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली अर्पण केलीय.

ree

अपघात झाला तेव्हा सायमंड्स हा गाडीमध्ये एकटा प्रवास करत होता. अपघातामुळे सायमंड्सला गंभीर दुखापती झाल्या. घटनेनंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले. सायमंड्सने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळले आहेत. १९९७ ते २००७ दरम्यान सायमंड्स हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग होता. त्यानंतर सायमंड्स हा फॉक्स क्रिकेटसाठी समालोचक म्हणून काम करत होता. सायमंड्सचा मृत्यू हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांसाठी या वर्षातील तिसरा धक्का आहे. यापूर्वी शेन वॉर्न आणि रॉड मार्श या दोघांचाही अशाच प्रकारे आकस्मिक मृत्यू झालाय.


 
 
 

Comments


bottom of page