top of page

‘अमूल’चे दुध महागले; उद्यापासून लागू होणार नवे दर

देशातील अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी 'अमूल'नं दुधाचे दर वाढविले असून हे नवे दर उद्यापासून लागू होणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 'अमूल'ने दुधाचे दर प्रतिलिटर २ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता अर्धा लिटर अमूल गोल्डची नवीन किंमत ३१ रुपये तर अर्धा लिटर अमूल ताजाची किंमत २५ रुपये झाली आहे. याशिवाय अमूल शक्ती दुधाच्या प्रत्येक अर्धा लिटरच्या पाकिटासाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत.

ree

येत्या १७ ऑगस्टपासून अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी हे नवे दर लागू होणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. उत्पादन आणि वितरणाचा खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं अमूलकडून सांगण्यात आलं आहे.

Comments


bottom of page