top of page

अमृता राव-अनमोलने शेअर केला ‘वीर’चा फोटो

विवाह’ फेम अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल काही महिन्यांपूर्वी आई-बाबा झाले. गेल्या 1 नोव्हेंबरला अमृताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. अनमोलने पहिल्यांदाच वीरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. वीर या फोटोत खूपच क्यूट दिसत आहे.

ree

आमचे जग... आमचा आनंद... असे त्याने या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे. 2016 मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी अमृता आणि अनमोल सात वर्षे डेट करत होते. अमृता आणि अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले.


 
 
 

Comments


bottom of page