top of page

विधी विद्यार्थ्यांचे पूर्ण मुल्यांकन करून त्यांना पास करा; ऑल इंडिया लॉ स्टुडन्ट युनियनची मागणी

अमरावती : अमरावती विद्यापीठाचे विविध शाखेचे परीक्षा निकाल जाहीर होत आहेत .अशातच विधी विभागाचा ही निकाल जाहीर झाला. तेव्हा दरवर्षी प्रमाणेच गुणांकन यामध्ये चुकीने कमी गुण प्रदान करण्यात आलेत. त्यामुळे ऑल इंडिया लॉ स्टुडन्ट युनियन आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना संयुक्त निवेदन दिले.

ree

विधी शाखेच्या तृतीय वर्षाच्या पाचव्या सेम मधील न्यायशास्त्र व संशोधन कार्याप्रणाली आणि उर्वरित बाकी 3 विषयात पेपर तपासणी करीता विद्यापीठाकडून नियुक्त करण्यात आलेल्या तपासणी मध्ये चुका झाल्याचे आणि विद्यार्थी यांनी पेपर जेवढे सोडविले. त्यानुसार गुणांकन झाले नाही बहुतेक विधी विद्यार्थी यांच्या गुणपत्रिका पाहिल्यावर लक्षात आले आहे. त्यामुळं भविष्यातील एक वर्षाचा कालावधी एक चुकीमुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या समस्या आणि मानसिक त्रास सहन करावं लागणार आहे. तेव्हा सर्व विधी विद्यार्थी डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय प्राचार्य यांच्या सहकार्याने सदर निवेदनातून कुलगुरू यांना विद्यार्थी ज्या विषयात विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांचे पूर्ण मूल्यांकन करून त्यांना पास करण्यात यावं असं कुलुगुरुंना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटल आहे.

सदर निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास सर्व डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थी व अखिल भारतीय विधी विद्यार्थी संघटना मिळून विद्यार्थी यांना न्याय हक्क मिळावा याकरिता कठोर कायदेशीर व उग्र स्वरूपात पवित्रा उचलेल. ज्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाल्यास त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार राहाल असे सदर निवेदाद्वारे कुलगुरू यांना कळविण्यात आहे. निवेदन देतेवेळी ऑल इंडिया लॉ स्टूडेंट युनियनचे अध्यक्ष राजू मधुकरराव कलाने, सचिव गौतम पिरखाजी खोब्रागडे,उपाध्यक्ष मोहित साहू तमिज खान,निलेश आमले,सागर पडोळे,ज्योती धांडे,सुनीता जाधव निलेश टापरे, प्रशांत भगत, ओंकार काळे, डिगांबर उके, प्रशांत भरडे, यश मंखानी, परेश साहू ,तसेच मोठ्या संख्येत विधी विद्यार्थी व युनियन पदाधिकारी उपस्थित होते.


 
 
 

Comments


bottom of page