top of page

कुत्रे मृतदेहांचे लचके तोडत आहेत.... मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून ... तरीही "ऑल इज वेल"

रणदीप सुरजेवाला यांनी साधला योगी सरकारवर निशाणा

ree

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वच राज्यांमधील आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत असल्याचं चित्र दिसत असून अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड्स, रुग्णवाहिका, औषधांचा तुटवडा जाणवत आहे. असं असतानादेखील उत्तर प्रदेशमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. यावरून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे योगी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने एका बातमीच्या आधारे उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर निशाणा साधालाय.


“उत्तर प्रदेशमध्ये कुत्रे मृतदेहांचे लचके तोडत आहेत. कचऱ्याच्या गाड्यांमधून मृतदेह वाहून नेले जात आहेत. मृतदेह नदीत फेकले जात आहे. असं असतानाही योगीजी तुम्ही सर्वकाही ठीक असल्याचं सांगत आहात. संत आणि महंत स्वप्नातही खोटं बोलत नाहीत असं म्हणतात. मात्र तुम्ही सर्वकाही ठीक आहे, असा खोटा दावा करुन, असत्य बोलून योगीजी धर्माचा आणि राजधर्माचाही अपमान करताय,” असं सुरजेवाला यांनी ट्विट मध्ये म्हंटलं आहे.

या ट्विटसोबत सुरजेवाला यांनी बातमीची लिंक पोस्ट केली आहे. या बातमीमध्ये उत्तर प्रदेशमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो दाखवून राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page