top of page

अलिबाग-मुरुड मार्गावरील पूल कोसळला

अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील छोटा पूल कोसळला आहे. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी पूलावरील दोन वाहने देखील कोसळली मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सहा जणांना वाहनांमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतूक सुपेगाव मार्गे वळविण्यात आली आहे. पूल जीर्ण झाला आहे त्यामुळे पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

 
 
 

Comments


bottom of page