top of page

सोलापूरच्या अक्षय इंडीकरचा कॅनडात डंका; OIFFA अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर

कॅनडामध्ये पार पडलेल्या ओटावा इंडियन फिल्म फेस्टीव्हल अवॉर्ड ( OIFFA ) मध्ये सोलापूरच्या अक्षय इंडीकरला ‘स्थलपुराण’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला. तसचं ‘स्थलपुराण’ सिनेमातील नील देशमुख या बालकलाकाराला सर्वोत्कष्ट बालकलाकाराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. हे पुरस्कार जाहीर होताच अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. “कॅनडा मधील चित्रपट महोत्सवात मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार जाहीर झाला आहे. माझ्या संपूर्ण टिमचं हे यश आहे. हा पुरस्कार मी माझ्या मराठी भाषेला अर्पण करतो.” असं अक्षयने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

ree

‘स्थलपुराण’ या सिनेमाला याआधी देखील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. लॉस एंजेलिसच्या IFFLA फेस्टिवलमध्ये 'स्थलपुराण' क्लोजिंग फिल्म दाखवली गेल्यानंतर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनं अक्षयचं भरभरुन कौतुक केलं होतं. अनुराग स्वत: अक्षयला भेटण्यासाठी त्याच्या घरी देखील गेला होता. अक्षयनं याबाबतचा अनुभव सोशल मीडियावर शेअर देखील केला होता.


 
 
 

Comments


bottom of page