top of page

"या" नेत्याची २७ महिन्यांनंतर तुरुंगातून झाली सुटका; समर्थकांनी स्वागतासाठी केली मोठी गर्दी

प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं

सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना आज (शुक्रवारी) सकाळी आठ वाजता तुरुंगातून सोडण्यात आलं. . त्याच्या सुटकेबाबत स्थानिक न्यायालयाने सीतापूर कारागृह प्रशासनाला सुटकेचे आदेश जारी केले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी सपाचे अनेक नेते आणि त्यांची दोन मुले तुरुंगाबाहेर पोहोचली होते. जवळपास २७ महिन्यांनंतर आझम खान आझम खान यांनी तुरुंगाबाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं. तुरुंगातून बाहेर पाडल्यानंतर ते गाडीच्या काचाही खाली न करता निघून गेल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान, आझम खान यांच्यावर ८९ वेगवेगळ्या प्रकारचे खटले सुरु आहेत. त्यामुळे त्यांना २७ महिने तुरुंगात रहावं लागलं. २६ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना अटक करण्यात आली होती.


 
 
 

Comments


bottom of page