top of page

VIDEO: खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेला शब्द पाळला, बैलगाडा शर्यतीत ...

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द पाळला

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा मालकांना "ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी तुमचा हा पठ्ठ्या पहिल्या बारी पुढे घोडी धरणार म्हणजे धरणार" असा शब्द दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतींच आयोजन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील आयोजित बैलगाडा शर्यतीत अमोल कोल्हे यांनी घोडीवर बसून बारी मारत आज आपला शब्द पाळला आहे.

ree

व्हिडीओ पाहा :

पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथे आज बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे यांनी घोडीवर बसून बैलजोडीसमोर बारी मारली. यावेळी बैलगाडा शौकीन आणि प्रेमींमध्ये एकच जल्लोष सुरू होता. यावेळी अमोल कोल्हे समर्थक आणि बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.


काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे बैलगाडी पुढे घोडेस्वारी करणार का? असा प्रश्न शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विचारत टोला लगावला होता.


 
 
 

Comments


bottom of page