top of page

आणखी कठोर निर्णय घेण्यास लावू नका ...

अजित पवारांचं पुणेकरांना आवाहन

ree

जवळपास दीड ते दोन महिन्यांनंतर पुण्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर पुण्यातील रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये लोकांनी गर्दी केली. या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त करत "नागरिकांनी गर्दी करू नये. बाहेर पडताना, नियमांचे पालन करावं", असं आवाहन केलं.


“गर्दी झाली तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. व्यापाऱ्यांना देखील विनंती आहे, त्याबद्दल लक्ष द्यावे. अन्यथा आणखी कठोर निर्णय घेण्यास लावू नका. लोक कंटाळली आहेत. लोकांची कामे रखडली आहेत, त्यामुळे बाहेर पडत आहेत. पण कोरोनाचे संकट दूर झालेलं नाही. जर गर्दी वाढत राहिली, तर एका बाजूची आज आणि दुसर्‍या बाजूची उद्या अशा पद्धतीने दुकाने सुरू करण्याची वेळ आणू नका,” असं अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.


 
 
 

Comments


bottom of page