top of page

मोठी बातमी ! राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सरकारी बंगल्यामध्ये आज सकाळी एक अज्ञात व्यक्तीने कारसह घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीला रोखलं आणि मोठा अनर्थ टळला. या व्यक्तीला सध्या दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. .

ree

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीला पकडल्यानंतर तो विचित्र पद्धतीने बडबड करताना दिसला आहे. तो आपल्या शरीरात कोणीतरी चिप बसवली असल्याचे सांगत होता. तसेच आपल्याला रिमोटद्वारे नियंत्रित केलं जात असल्याचा दावा या व्यक्तीकडून केला जात होता. या घटनेची दखल घेत पोलिसांनी त्याच्या संपूर्ण शरीराची तपासणी केली. मात्र पोलिसांना त्याच्याकडे कोणतीही चिप आढळली नाही. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती कर्नाटकातील बेंगळुरू येथील रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांचे दहशतवादविरोधी युनिट, स्पेशल सेल त्या व्यक्तीची चौकशी करत आहे.



 
 
 

Comments


bottom of page