top of page

ऐतिहासिक निकाल ! ...प्रकरणी ३८ जणांना फाशीची शिक्षा; ११ जणांना जन्मठेप

अहमदाबाद कोर्टाचा मोठा निर्णय

अहमदाबादमध्ये २४ जुलै २००८ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने ३८ जणांना फाशीची तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यावेळी न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ree

२६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात ५६ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०० जण जखमी झाले होते. १३ वर्षांहून अधिक काळ कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. या प्रकरणी एकूण ७८ आरोपी होते. त्यातील एक आरोपी माफीचा साक्षीदार बनला होता.

या प्रकरणी तब्बल ११६३ जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी विशेष न्यायालयाने ७७ पैकी ४९ जणांना दोषी ठरवले होते, तर २८ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. विशेष न्यायालयाने आज अखेर ४९ पैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली तर ११ जणांना जन्मठे पेची शिक्षा सुनावली आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणावर दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.


 
 
 

Comments


bottom of page