top of page

अहमदनगर : गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग

अहमदनगर : जिल्ह्यातील गंगा माई साखर कारखान्याला शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली. डिस्टिलरी विभागात ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी ७० ते ८० कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे.


शनिवारी सायंकाळी गंगामाई साखर कारखान्यात कर्मचारी नेहमीप्रमाणे काम करत होते. यावेळी डिस्टिलरी विभागाला अचानक आग लागली. आग लागल्याचं समजताच कामगारांंमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक कामगार जीव मुठीत घेऊन कारखान्यातून बाहेर पडले. घटनास्थळी ठरावीक कालावधीत छोटे-छोटे स्फोट होत आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरू आहे.


 
 
 

Comments


bottom of page