top of page

डॉक्टर तरुणीची आत्महत्या; घटनास्थळी सापडली इंजेक्शनची बाटली आणि सिरींज

कोल्हापुरातील डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीचा मृतदेह फुटपाथवर आढळून आला आहे. तर तिच्या शेजारी इंजेक्शनची बाटली आणि सिरींज आढळून आली. त्यामुळे या इंजेक्शनची अधिक मात्र घेऊन तिने जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या तरुणीने आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. आता पोलीस या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ree

अपूर्वा हेंद्रे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव असून ती कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ प्रवीण हेंद्रे यांची कन्या आहे. शनिवारी रात्री मित्रांसोबत पार्टी करून ती घरी परतली होती. पहाटेच्या सुमारास ती घरातून कोणाला न सांगता बाहेर पडली. सकाळी अपूर्वा दिसत नसल्याने तिच्या वडिलांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती. पण ती कुठेच न सापल्यानं अखेर याबाबत पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. दरम्यान, न्यू शाहूपुरीतील फुटपाथवर तिचा मृतदेह आढळून आला आहे.

पोलिसांनी अपूर्वाचा व्हिसेरा राखून ठेवला असून त्याच्या रिपोर्टमधून अधिक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या शाहूपुरी पोलीस या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहेत.



Comments


bottom of page