top of page

ए भाई , तू जो कोण असशील ...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ‘मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती. याचं उत्तर द्यावं’, असा सवाल उपस्थित केला होता.

ree

त्यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमृता यांनी जगताप यांचा एकेरी उल्लेख केलाय. “ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं नाही. पोलिसांची खाती राज्यात यूटीआय बँक/अ‍ॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही!” असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना इशारा दिला आहे.

 
 
 

Comments


bottom of page