top of page

लशीसाठी अदर पुनावालांना धमक्यांचे फोन; काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींनी आणला दबाव

लंडन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात बिकट परिस्थिती झाली असून देशात लसीकरण मोहीमही राबविण्यात येत आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींना भारत सरकारने मान्यता दिली आहे. परंतु लसींचा तुटवडा देशभर जाणवत आहे. अशातच मागील काही दिवसांपासून देशातील काही शक्तीशाली लोकं ज्यामध्ये नेते, काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचा समावेश आहे, त्यांच्याकडून वारंवार फोन येत आहेत. आम्हालाच लस लवकर हवी आहे, असं म्हणत त्यांच्याकडून दबाव आणला जात असल्याचं धक्कादायक वक्तव्य सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाल यांनी केलं आहे. अदर पूनावाला हे कुटुंबासोबत सध्या ब्रिटनमध्ये असून "द टाईम्स यूके"ला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे,

ree

याला धमक्या म्हणणं फार साधी गोष्ट ठरेल. या लोकांना असणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्याकडून वापरली जाणारी भाषा खरोखर खूपच विचित्र आहे. खरं तर हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. प्रत्येकाला आपल्याला लस मिळावी असं वाटतं आहे. मात्र आपल्याआधी इतरांना लस का दिली जातेय हे त्यांना समजत नसल्याने अडचण निर्माण होत असल्याचं पूनावाला यावेळी म्हणाले आहेत.


 
 
 

Comments


bottom of page