top of page

अनिल देशमुखांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पाचवेळा समन्स पाठवले. परंतु वैद्यकीय कारणं, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी, अशी कारणं अनिल देशमुखांकडून सांगण्यात आली. पण अचानक अनिल देशमुख चौकशीला हजर राहिले आणि त्यानंतर झालेल्या प्रदीर्घ चौकशीनंतरही समाधान झालं नाही म्हणून ईडीनं देशमुखांना अटक केली. देशमुख यांना ठोठावण्यात आलेली ईडी कोठडी आज संपल्याने आज पुन्हा एकदा त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.. यावेळी कोर्टाने अनिल देशमुखांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे,

ree

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना तळोजा किंवा आर्थररोड कारागृहात रवानगी होणार असल्याचे समजते.


 
 
 

Comments


bottom of page