top of page

अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक

काल सक्तवसुली संचलनालय (ईडी) कडून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर व मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, आज (शनिवार) त्यांचे स्वीय सहायक ( पीए) संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीसाठी या दोघांना कालच ताब्यात घेण्यात आलं होतं. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती. त्याशिवाय केंद्रीय अन्वेषण विभागानेही त्यांच्या घरी छापे टाकले होते.

ree

दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलंआहे. ”वाझे वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना आज ईडीने अटक केली. मला खात्री आहे पुढील काही दिवसांत अनिल देशमुख यांना अटक होईल. असं किरीट सोमय्या यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

आयुक्तपदी असताना ते गप्प का होते ?- अनिल देशमुख

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात स्फोटकांची गाडी उभी करण्याच्या प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद होती. पदावरून हटविण्यात आल्याच्या रागातून त्यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आयुक्तपदी असताना ते गप्प का होते, असा सवाल करीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.


 
 
 

Comments


bottom of page