top of page

अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल; घर, कार्यालयासह 10 ठिकाणी सीबीआयची छापेमारी

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांचे घर, कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांची सीबीआयकडून 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवालही तयार केला. हा अहवाल कोर्टात सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ree

दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.


 
 
 

Comments


bottom of page