top of page

...हा फक्त अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का?

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई करत अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता नुकतीच जप्त केली आहे. या पार्श्वभूमीवर " हा फक्त अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का?" असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.

ree

“अविनाश भोसले यांची मालमत्ता ईडीकडून सील? हा फक्त अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का?खरंतर हे व्हायलाच हव, पण ईडी हे भाजपाला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे. अजित पवारांवर व अविनाश भोसले यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई केली असती तर खरंच आनंद झाला असता”.असं अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



 
 
 

Comments


bottom of page