top of page

अनिल देशमुख यांच्यावरील आरोप संशयास्पद ?

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 'व्हॉट्सअप चॅट'चा मजकूर जाहीर केला होता. तसंच, आर्थिक व्यवहारांबाबत बोलण्यासाठी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांची भेट घेतली असल्याचे सांगितले होते. मात्र, हे आरोप संशयास्पद असल्याचं आता समोर येत आहे.

ree

अनिल देशमुख यांनी वाझेंना मुंबईतील 'ज्ञानेश्वरी' बंगल्यात भेटायला बोलावलं होतं. मात्र, ज्या दिवशी वाझे आणि देशमुख यांची भेट झाल्याचा दावा परमबीर यांनी केलाय, त्या दिवशी अनिल देशमुख हे मुंबईत नव्हते. तर नागपूरमध्ये कोरोनावर उपचार घेत होते. रुग्णालयाच्या कागदपत्रांतून ते समोर आलं आहे. 'सीएनएन न्यूज १८' या इंग्रजी वृत्तवाहिनीनं याच कागदपत्रांच्या आधारे तसा दावा केला आहे.


परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे,' असं अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.


 
 
 

Comments


bottom of page