top of page

भीषण अपघातात पिकअप गाडीचा चक्काचूर

इगतपुरी : मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या बोरटेंभे ब्रिजजवळ आयशर आणि पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला. शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे तर दोघा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात पिकअप कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.



Comments


bottom of page