top of page

बस-टेम्पोचा भीषण अपघात; १७ जणांचा मृत्यू

मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास बस आणि टॅम्पोच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कानपूर (उत्तर प्रदेश) च्या किसान नगर येथील महामार्गावर झाला असून अपघातातील जखमींना लाला लजपत राय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती सचेंडी पोलिसांनी दिली आहे.

ree

जखमीपैकी अनेकजण हे कानपूर जिल्ह्यातील सचेंडी येथील असून बिस्कीटच्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार आहेत. हे कामगार टेम्पोने कामासाठी कारखान्यामध्ये जात असतानाच हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणात तातडीने मदत करण्याचे आणि जखमींवर उपचारासंदर्भातील निर्देश दिले आहेत. या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त करतानाच मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक २ लाखांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या अपघातामध्ये मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातलगांना राष्ट्रीय मदतनिधीमधून २ लाख रुपये देण्याची घोषणा केलीय. जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केलीय आहे.


 
 
 

Comments


bottom of page