top of page

दुचाकीचा अपघात; दोन तरुणांचा मृत्यू

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. विकास तोरस्कर (वय १९) आणि ऋषिकेश कांबळे (वय २०) असं मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहे. कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर बालिंगा गावाजवळ हा अपघात घडला.

ree

विकास आणि ऋषिकेश आपल्या इतर दोन मित्रासोबत कोल्हापूर शहरात गेलेले होते. ते रात्री पुन्हा आपल्या घरी परतत होते. तेव्हा ऋषिकेश आणि विकास एका दुचाकीवरुन येत होते. तर अन्य दोन मित्र दुसऱ्या दुचाकीवर होते. घरी परतत असतेवेळी बालिंगा गावाजवळ एका अज्ञात अवजड वाहनाने ऋषिकेश आणि विकासच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसल्यानंतर दोघेही दूरवर फेकले गेल्यानं ते जखमी होऊन दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडले होते. जखमी विकास आणि हृषिकेशला सीपीआ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच त्यांचा मृ्त्यू झाला होता.

ऐन गणेशोत्सवात दोघांचा मृत्यू झाल्यानं चिंचवडे गावावर शोककळा पसरली. विकास हा एका खासगी कंपनीत काम करत होते. तर ऋषिकेश शिक्षण घेत होता. या दोघांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्यासोबतच गेलेल्या इतर दोन मित्रांनाही मोठा धक्का बसला. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून पुढील तपास केला जातोय.


 
 
 

Comments


bottom of page