top of page

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात; थोडक्यात बचावले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई पुणे महामार्गावर पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, या अपघातातून आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहेत. त्यांना मुंबईकडे नेण्यात आलं आहे. रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली ही घटना आहे. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही.

आमदार संग्राम जगताप आज पहाटे आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यादरम्यान रसायनीजवळ बस आणि कारचा अपघात झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट झाले नाही. यात जगताप यांना कोणतीही इजा झालेली नसून, ते मुंबईला पोहोचले आहेत.



 
 
 

Comments


bottom of page