top of page

भीषण अपघात; उड्डाणपुलावरुन ८० फूट खाली पडून चौघांचा मृत्यू

भरधाव कारने मोटारसायकलला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जण ७० ते ८० फूट उड्डाणपुलावरुन खाली फेकले गेले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान चिमुकल्यांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास नागपूर शहरातील सक्करदरा परिसरात हा भीषण अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील सक्करदरा येथील पुलावर भरधाव कारने एकापाठोपाठ तीन गाड्यांना धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील एका कुटुंबातील चार जण ७० ते ८० फूट उड्डाणपुलावरून खाली फेकले गेले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विनोद खापेकर (४५), त्यांची आई लक्ष्मीबाई (६५) आणि त्यांची ५ आणि ११ वर्षे वयाची दोन मुले अशी मृतांची नावे आहेत. तर गणेश आढाव असे त्या कार चालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेत अन्य दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 
 
 

Comments


bottom of page