top of page

कृषी सहसंचालकांच्या घरून तब्बल ७ किलो सोने जप्त

बेंगळुरूः १५ सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau ) बुधवारी सकाळी कर्नाटकातील ६८ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या छाप्यादरम्यान एका अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ७ किलो सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत जवळपास साडे तीन कोटी आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कृषी विभागाचे सहसंचालक रुद्रेशप्पा टी एस यांच्या अवैध संपत्तीची माहिती मिळाली होती, त्यानंतर हा छापा टाकण्यात आला, ज्या दरम्यान या अमाप संपत्तीचा खुलासा करण्यात आला आहे. छाप्यामध्ये ७ किलो सोने, ३ किलो चांदीसह १५ लाखांची रोकड रक्कमही जप्त करण्यात आली. रुद्रेशप्पा टीएस व्यतिरिक्त इतर अनेक संस्था आणि अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर एसीबीचे छापे बुधवारी पडले.

बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ने १५ सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत कर्नाटकातील ६८ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले असून रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.

.

 
 
 

Comments


bottom of page