top of page

अभिजीत बिचुकलेंचं पुन्हा एकदा डिपॉझिट जप्त

'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकले यांना पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत वरळी विधानसभा निवडणुकीतल्या मतांपेक्षा कमी म्हणजे अवघी १३७ मते मिळाली आहेत. म्हणून या निवडणुकीतही त्यांचं पुन्हा एकदा डिपॉझिट जप्त झालं आहे.

ree

अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवक ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुले आव्हान दिलं आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना १५० मतं मिळाली होती. बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना एकदाही यश आलेलं नाही.

 
 
 

Comments


bottom of page