top of page

महाराष्ट्रात सरकार उद्धव ठाकरेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने होळी आणि धूलिवंदन साजरी करण्यासाठी नियमावली जारी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी सण साजरा करण्यावर सरकारने निर्बंध घातले आहेत. या विरोधात भाजप आक्रमक झाली असून भाजपा नेत्यांनी ‘शिवसेनेचा फतवा धाब्यावर बसवा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून होळी साजरी करा’, असं आवाहन केलं आहे.

ree

राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून होळी व धूलिवंदनासाठी नियमावली जारी केली आहे. संसर्ग रोखण्यासाठी होळीनिमित्त शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त ठेवली जाणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करू नये यासाठी पोलिसांनीही नागरिकांना सूचना दिल्या आहेत. होळी आणि धूलिवंदन हा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई केली आहे.

होळी आणि धूलिवंदन साजरी करण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीवरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारने होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदूविरोध खपवून घेणार नाही. हिंदूनो जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा,सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार.” असं ट्विट करत अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.


 
 
 

Comments


bottom of page