top of page

पुण्यात तरुणाचा गोळ्या झाडून खून

पुणे : येथील चंदननगर परिसरात एका तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली. अक्षय भिसे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्वैमनस्यातून हा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसानी दिली. अक्षय चंदननगर परिसरात मंदिरा जवळ थांबला होता. त्यावेळी त्याचावर दोघांनी पिस्तुलातून गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


 
 
 

Comments


bottom of page