top of page

Video : अमिताभ बच्चन यांचा नातू बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण; नातवासाठी शेअर केली खास पोस्ट

झोया अख्तर दिग्दर्शत ‘द आर्चीज’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा बरोबर शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर हे ही ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नातवासाठी ट्विटरवर खास पोस्ट शेअर केली आहे. .

‘द आर्चीज’ हा चित्रपट आर्ची कॉमिक्सवर आधारित असून या चित्रपटात शाहरुखची मुलगी सुहाना खान महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर या स्टारकिड्ससोबतच अभिनेत्री डॉट, मिहिर आहूजा, वेदांग रैना, युवराज मेंडा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने जोया अख्तर आणि रीमा कागती पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत.

२०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.


 
 
 

Comments


bottom of page