top of page

४ दिवस काम, 3 दिवस सुट्टी ....; कामगार कायद्यांमध्ये होणार महत्त्वाचे बदल

केंद्र सरकार कामगार कायद्यांमध्ये काही बदल करण्याच्या तयारीत असून या कायद्याची लवकरच अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. कामगार कायद्यात बदल केल्यास त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांवर होणार आहे.

ree

केंद्रीय कामगार राज्यमंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तरादरम्यान कामगार कायद्याची मसुदा निर्मिती १३ राज्यांनी पूर्ण केली आहे तर अन्य २४ राज्ये व केंद्रशासित प्रदेश मसुदा निर्मितीवर काम करत असल्याची माहिती दिली.

सर्व राज्यांनी हा कायदा एकाचवेळी लागू करावा यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या नव्या वर्षात ४ दिवसांचा आठवडा देखील येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं फेब्रुवारी महिन्यात या कायद्यांचे मसुदे अंतिम टप्प्यात आणले होते. १३ राज्यांकडून या संदर्भात हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.


काय होणार महत्त्वाचे बदल

  • एकूण वेतनाच्या ५० टक्के मूळ वेतन असणार

  • उर्वरित ५० टक्के वेतन हे भत्ते स्वरूपात मिळणार

  • पीएफ आणि ग्रॅच्युईटीची रक्कम वाढणार

  • पण प्रत्यक्षात टेक होम सॅलरी कमी होण्याची चिन्हं आहेत

  • कामाचे तास ८ ऐवजी १२ तास

  • ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी


 
 
 

Comments


bottom of page