top of page

तब्बल २८० कोटींच्या ‘हेरॉईन’सह पाकिस्तानी बोट पकडली

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस यांनी संयुक्त कारवाई करत सुमारे २८० कोटी रुपये किंमतीचे हेरॉईन घेऊन जात असलेल्या ‘अल हज’ या पाकिस्तानी बोटीला पकडले. पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होती. आता पुढील तपासासाठी ही बोट जखाऊ येथे आणली जात असल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाकडून देण्यात आलेली आहे. या अगोदर देखील भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ‘अंकित’ने जानेवारी महिन्यात रात्री अरबी समुद्रात केलेल्या कारवाईदरम्यान ‘यासिन’ या पाकिस्तानी बोटीला पकडले होते.


 
 
 

Comments


bottom of page