top of page

फिश फ्राय

Fish Fry

साहित्य 

सुरमई किंवा जो उपलब्ध असेल तो मासा - १/२ किलो
ओवा - १/४ चमचा
लाल तिखट- १ चमचा
हळद - १/२ चमचा
लिंबूरस - २ चमचा
तांदळाचं पीठ - ३ चमचा
आलं-लसूण पेस्ट - १ चमचा
मीठ चवीप्रमाणे
तेल (शालो फ्राय करण्यासाठी) - ४ चमचा

कृती 

माशाचे २" x २" तुकडे करा.
माशाला आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, लिंबूरस, ओवा, मीठ लावून १ तास मॅरीनेट करून ठेवा.
मॅरीनेट केलेल्या माशाचे तुकडे तांदळाच्या पिठात घोळवा. एका तव्यावर तेल गरम करा आणि तुकडे शालो फ्राय करून घ्या.लिंबू आणि मिठामुळे तुकड्यांना पाणी सुटेल त्यामुळे तांदळाचे पीठ चिकटून राहील आणि तुकडे चांगल्या प्रकारे फ्राय करता येतील.
तुकडे ५ मिनिटा नंतर उलटे करा आणि दुसरी बाजू सुद्धा फ्राय करून घ्या. गरज वाटल्यास थोडे तेल घाला. दोनही बाजू खरपूस भाजल्यावर जास्तीचे तेल टिशू पेपरनी टिपून घ्या आणि ग्रीन मिंट चटणी बरोबर सर्व्ह करा.

-

मो. 

TRP%202_edited.jpg

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

bottom of page