top of page

“जागा आणि वेळ तुम्ही सांगा मी तिथे येते”

Image-empty-state.png

अभिनेत्री कंगना रनौत काही महिन्यांपासून सतत विविध कारणांमुळे चर्चेत आहे. यावेळी तिने उर्मिलाने घेतलेल्या नवीन ऑफिसवरून टिकास्त्र सोडल्यानंतर आता उर्मिलानेही कंगनाला थेट आव्हान दिलं आहे. “तुम्ही जागा आणि वेळ सांगा, मी सगळी फ्लॅट आणि ऑफिसची डॉक्युमेंट्स घेऊन हजर होते. त्याबदल्यात तुम्ही फक्त ड्रग्ज घेणा-यांची ती यादी द्या”, अशा शब्दांत उर्मिला यांनी कंगनाला आव्हान दिलंय.

उर्मिला मातोंडकर यांनी अलिकडेच मुंबईत नवीन कार्यालय खरेदी केले. त्यावरुन कंगना रनौतने “मी एवढ्या मेहनतीने घर बांधलं तेही काँग्रेसने तोडलं. खरंच लोकं म्हणतात तसं भाजपाला साथ देऊन तर माझ्या हाती काय लागलं… तर 20-25 कोर्ट केसेस. तुमच्याप्रमाणे मी समजदार नाही ना, नाहीतर मी पण काँग्रेसचा हात पकडला असता. किती मूर्ख आहे मी…” असं ट्विट करत उर्मिलाला लक्ष्य केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना उर्मिला यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. गणपती बाप्पा मोरया या कॅप्शनसह पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, “नमस्कार कंगना जी…माझ्याबद्दलचे तुमचे जे उच्च विचार आहेत ते मी ऐकले आहेत. मीच काय तर पूर्ण देशाने ते विचार ऐकलेत. आज पूर्ण देशासमोर मी तुम्हाला सांगू इच्छिते, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा…मी माझे सगळे कागदपत्र तेथे घेऊन येते…मी केलेला हा सर्व व्यवहार राजकारणात येण्याआधी केला होता. याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही फक्त एक काम करा, एनसीबीला तुम्ही जी यादी देणार होतात, ती द्या. तुमच्याकडे अशा कोणत्या लोकांची नावे,आहेत याची माहिती मलाच काय पण देशाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे…तुमच्या उत्तराची वाट बघतेय.. तोपर्यंत…जय हिंद…जय महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा मोरया”, असं आव्हान उर्मिला यांनी कंगनाला दिलं आहे.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page