top of page

धनश्रीच्या घरी छोट्या चिमुकल्याचे आगमन

Image-empty-state.png

लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील राणादाच्या ‘वहिनीसाहेब’ म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर आता ‘आईसाहेब’ झाल्या आहेत. आई झाल्याची बातमी धनश्रीने स्वत: तिच्या सोशल मीडियावरुन दिली आहे. धनश्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

‘आज सकाळीच आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. ही बातमी सांगताना मला खूप आनंद होत आहे. सर्वांच्या आशिर्वादाने मी आणि माझे बाळ आम्ही दोघेही सुखरुप आहोत. तुमच्या सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा अशाच कायम राहो’,असे धनश्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तिच्या चाहत्यांबरोबर अनेक सेलिब्रेटींनीही धनश्रीला शुभेच्छा दिल्या.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page