top of page

आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले ९ फोटो

Image-empty-state.png

मुंबई- आराध्याच्या ९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर आराध्याच्या फोटोंचा एक कोलाज शेअर करत आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यात आराध्याच्ये नऊ फोटो एकत्र करण्यात आले आहेत. पहिल्या वर्षापासून ते नवव्या वर्षांपर्यंतचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

यावर्षी अमिताभ बच्चन यांच्याकडे दिवाळी पार्टी नव्हती. बिग बींनी कोरोना तसेच मुलगी श्वेताची सासू रितू नंदा यांच्या निधनामुळे रद्द केल्याचं याआधीच सांगितलं. असं असलं तरी आराध्याचा वाढदिवस साजरा होईल असा विश्वास अनेकांना आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वीच आराध्याची आई अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा वाढदिवसही झाला. आता चाहत्यांना आराध्याच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर कधी शेअर होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page