महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Saturday, 22 November 2025
.mahanewsonline.com
महाराष्ट्र
देश-विदेश

लखनौ : बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशसह विविध राज्यांतील कोविड -१९ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने चिंता व्यक्त केली आणि केंद्राला याबाबत त्वरित पावले उचलण्यास सांगितले. एका ट्वीटमध्ये मायावती म्हणाल्या, "देशातील कोरोना साथीच्या साथीच्या विरोधात सध्या सुरू असलेल्या लढाईत पीपीई किट नंतर खासकरुन उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता ही अत्यंत चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत केंद्राने त्वरित प्रभावी पावले उचलली पाहिजेत जेणेकरून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या वाढत्या घटनांना रोखता येईल,"

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. राज्यपालांनी संपूर्ण गडाची पायी फिरून पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेचे दर्शन घेतले तसेच श िवजन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याला वंदन केले.

एखाद्या चित्रपटात शोभेल असा कानपूर पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर विकास दुबे याचा एन्काऊंटर झाला आहे. अटक केल्यानंतर विकास दुबेला एसटीएफच्या गाडीतून कानपूरला आणले जात होते. पावसामुळं रस्ता काहीसा निसरडा झाला होता. बर्रा येथे असताना भरधाव वेगात असलेली पोलिसांची कार अचानक उलटली. या अपघातात दुबेसह काही पोलीस जखमी झाले. जखमी अवस्थेतही दुबे पळण्याची संधी शोधत होता. ही संधी मिळताच त्यानं एका पोलीस अधिकाऱ्याचं पिस्तूल हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला इशारा देत शरण येण्याचं आवाहन केलं. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळं पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्यात दुबे जागीच ठार झाला.