top of page

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या सर्व याचिकांची सुनावणी ११ जानेवारीला

गेल्या ४१ दिवसांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली असून सुप्रीम कोर्टाने नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या सर्व याचिकांवर ११ जानेवारीला सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आंदोलनाशी संबंधित परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं यावेळी सरन्यायाधीश शरद बोबडे, ए एस बोपन्ना आणि व्ही रामसुब्रहमण्यम यांच्या खंडपीठाने नमूद केलं. सुप्रीम कोर्टात नव्या कृषी कायद्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर वैधतेला विरोध करणाऱ्या सहा याचिका दाखल आहेत.

bottom of page