top of page

राज्यपालांनी दिला शरद पवारांना भेटण्याचा सल्ला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाढीव वीज बिलाचा मुद्दा मांडत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. यावेळी राज्यपालांनी शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला असल्याचे ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. “लोकांना येणाऱ्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. गेली अनेक दिवस माझा पक्ष, कार्यकर्ते प्रकरणी आंदोलन करत आहेत. याप्रकरणी अदानी, बीएसटीचे लोक भेटून गेले. वीज बिल आम्ही कमी करु शकतो पण एमईआरसीने आम्हाला मान्यता दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. पक्षाचं एक शिष्टमंडळ जाऊन एमईआरसीच्या लोकांना भेटून आले. “नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ सांगितलं, पण अजून तो होत नाही. राज्यपालांशी बोलल्यानंतर त्यांनी एकदा शरद पवारांशी बोलून घ्या सांगितलं. आपण लवकरच शरद पवारांना भेटणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

bottom of page