top of page

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियामध्ये फिरणारा ‘तो’ संदेश खोटा

‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने पुणे विभागातील काही जिल्ह्यात व्हाट्सअप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत. या संदशामध्ये दैनदिन जीवनावश्यक वस्तू हाताळणीसह वृत्तपत्रे बंद करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. हा संदेश खोटा असल्याची माहिती पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक युवराज पाटील यांनी दिली आहे. कोणतीही माहिती वा संदेश पुणे विभागातील जिल्ह्याकडून काढण्यात आला नाही. हा संदेश खोटा असून अशा बनावट मेसेजमधील आवाहनाला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. आपत्तीच्या काळात लोकांची दिशाभूल होईल, असा कोणताही मजकूर जिल्हा माहिती कार्यालयाचे नाव टाकून खोडसाळपणे पसरविणाऱ्या संबंधितावर यापुढे कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

bottom of page